STORYMIRROR

Dnyaneshwar Hogale

Romance

3  

Dnyaneshwar Hogale

Romance

प्रेमस्पर्श तुझा माझा!

प्रेमस्पर्श तुझा माझा!

1 min
221

शोधूनही सापडणार नाही तुला

हा स्वर प्रेमाच्या पाखराचा,

सापडलाच तर बेसूर होऊनी

जाईल रंग तुझ्या आयुष्याचा,


निस्वर राहून गाणी आयुष्याची तुझ्या,

वाजतील जोरजोरात मनात माझ्या

तूच तुझ्यात अन् मीच माझ्यात,

जोडून स्पंद स्वरांचा तुझ्यामाझ्यात


गाऊ स्वरात स्वप्नाची नवी गाणी,

होऊन पुन्हा एक तरल नयन मनी

ध्यास तुझा अन् भासही तुझा,

होतो प्रेमस्पर्शाचा स्वप्नभास सारखा


मनावर हळुवार भावनांचा स्पर्श तुझा,

हलकेच काहीतरी बोलतोय मला,

सांग ना कुठला हा व्याकुळलेला,

अन् कुठला हा आसुसलेला,

प्रेमवेडेपणा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance