मी तुझ्यात तू माझ्यात...
मी तुझ्यात तू माझ्यात...

1 min

281
मी मनातल तुझ्या आभाळ होताना,
स्वप्ने रंगती तुझ्या नयनांत भेटताना.
मी मनातला तुझ्या भास होताना,
मन विरते तुझ्यात मी रंगी रंगताना.
मी सारे काही आपल्या नात्यात गुंफताना,
नाते नव्याने रुजते सुगंधात फुलताना.
त्या पहाटे मी तुझी वाट बघताना,
तू घेऊन यावा तो गोडवा दरवळणारा.
फुलतं जावे नाते आपले दिवस मावळताना,
रात्रीत फुलून सारे आनंदी करावे मनाला.
त्या प्राजक्तासारखा सुगंध द्यावा नात्याला.