"निरागस बालपण"
"निरागस बालपण"
ते होत एक सुंदर निरागस अस बालपण,
त्यात कळत नव्हतं आपलं तुपल काहीपण,
निस्वार्थ पणे जगत, रमत , बागडत होतो.
भाऊबंद एकमेकात जीवापाड गुंतून गेलो होतो.
पण जेव्हा कळू लागली आपली नातीगोती,
पुसून जायला लागली होती आठवणींची पाटी
आठवणींच सुंदर घरटं तयार झालं होत,
पण आता कुणीच त्यात राहत नव्हतं.
कुणी कुणाला क्षणभरही विचारत नव्हतं.
पैसा आणि संपत्ती प्यारी झाली होती,
माणसाला माणसाची किंमत राहिली नव्हती,
तेव्हा कळलं मोठेपणाचा "मी" मध्ये आला होता.
प्रेमात आणि नात्यात भांडण लावून गेला होता,
नात्यांचं घरट दार उघडून वाट पाहत होत.
कुणीतरी येईल राहायला म्हणून आवाज देत होत.
भिती वाटतेय खूप सारी आता, होईल काय ?
पैसा, मोठेपणाची आग नात्याला लागलं काय ?
अन आठवणींचं सुंदर घरट जळून जाईल काय ?
