प्रेमाची गोष्ट!
प्रेमाची गोष्ट!
कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरवून जावंसं वाटणं म्हणजे प्रेम?
कोणालातरी सारखं बघत राहावं असं वाटणं म्हणजे प्रेम की
तिला विसरता न येणं म्हणजे प्रेम?
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम की
आवडी-निवडी जुळवणं हे प्रेम?
कोणी आपल्या स्वप्नात येणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम?
कोणावर संपूर्ण विश्वास टाकणं म्हणजे प्रेम की
त्या विश्वासाला किंचितसाही तडा जाऊ न देणं म्हणजे प्रेम?
कुणावर हक्काने रागावणं म्हणजे प्रेम की
उगाचंच माफी मागणं म्हणजे प्रेम?

