STORYMIRROR

Harshada Wakchaure

Romance

3  

Harshada Wakchaure

Romance

प्रेम

प्रेम

1 min
207


आवडत मला तुझ्यासोबत भांडायला 

गोड गोड बोलुन तुला मनवायला

रूसुन बसल्यावर किती छान दिसतोस

मी काहीही बोलले तर नुसतीच मान हलवतोस...


माहितीय मला नाही येत राग तुला

उगाचच चिडण्याचा करतो मग बहाणा

नको बोलू माझ्याशी अस कितीही म्हटलास

तरी मला ऐकण्यासाठी नेहमीच तु आतुर असणार...


माझ शांत बसणं तुला सहणही होत नाही

माझ खोडकर वागणं तुला झेपतही नाही

मग नुसताच गालातल्या गालात हसत असतोस

एकटक माझ्याचकडे बघत बसतोस...


काय बघतो म्हटल तर स्वतःला सावरून घेतोस

दिवसाढवळ्या पडलेल सुंदर स्वप्न आहे म्हणतोस

स्थिर झालेल्या नजरेला मग लाडीगोडी लावतोस

ओठांवर आलेल्या शब्दांना हळूच मनात साठवून ठेवतोस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance