शब्दांचे घाव
शब्दांचे घाव
1 min
807
नसला जरी होत आवाज त्यांचा
तरी जोरदार बसतात घाव शब्दांचे
नकळतपणे बोलुन गेलेल्या शब्दांनी
घर केलेले असते मनामध्ये...
असतात वेदना त्याच्या एवढ्या कठीण
वर्षानुवर्षे जखमा त्याच्या भरल्या जात नाही
घातली कितीही हळुवार फुंकर त्यावर
तरी शब्दांचा घाव सहजासहजी पुसला जात नाही...
असतो म्हणायला फक्त शब्दांचा वार
तलवारीपेक्षाही जास्त असते त्याची धार
जपुन वापरावे लागतात शब्दही येथे
नाहीतर माणूसच जातो माणसापासून लांब...
