रुसवा
रुसवा
1 min
370
रुसवा होता माझा
मनवणे होते त्याचे
रुसव्यामागचे कारण
एक कोडेच झाले होते...
कोडे माझ्या रुसव्यामागचे
त्याला कधीच उलगडले नाही
उत्तर त्याचे त्याने मला
आजही मागितले नाही...
रुसवा फुगवा आमच्यातला
जोडून ठेवतो मनाला
पेरून बीज विश्वासाचे
नवीन अर्थ मिळतो नात्याला...
हवाय कशाला उलगडा
छोट्या छोट्या रुसव्यामागचा
नित्य निरंतर असुद्या ओठी
भाव त्या मागच्या प्रेमाचा...
