माझी लेखणी
माझी लेखणी
1 min
291
रोज मी माझ्या लेखणी सोबत बोलते
एक दिवस अचानक तिच माझ्याशी बोलू लागते...
घाबरून मी इकडे तिकडे बघत होती
अग मी लेखणी बोलते अस ती म्हणत होती...
नको ठेवू मनात काही सांग मला तुझी व्यथा
मी माझ्या लेखणीतुन मांडेन तुझी कथा...
ऐकुन तिच बोलण मीही आश्चयॆचकित झाले
न रहावुन मी तिला सगळकाही सांगू लागले...
कहानी सांगता सांगता मी माझ्यातच हरवुन गेले
डोळ्यात लेखणीच्या अश्रु मात्र दाटून आले...
