प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे काय असतं हे मला कधी कळलंच नाही..?
मुलगी म्हणून बापाने कधी जवळंच घेतलं नाही...!
आईचं तरी काय बोलावं बापाच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मतच झाली नाही...!
भाऊ तरी काय करतील त्यांना काही कळतच नाही..!
शाळेत गेली पण बाईंनाही मी आवडली नाही...!
त्यांच्या मुलीपेक्षा हुशार आहे ही गोष्ट त्यांना पटली नाही...!
म्हणूनच सतत शेंबडया म्हणून हिणवायची सवय काय त्यांची गेली नाही...!
भेटला एक मित्र पण त्यानेही साथ दिली नाही...!
म्हटलं आता तरी होईल स्वप्न पूर्ण पण त्या स्वप्नातही काही अर्थच नाही...!
मैत्रिणीशी प्रेम करून म्हणतो मी तुझ्याशी कधी प्रेमच केलं नाही...!
हसून म्हटलं दोष तुझा नाही रे बाबा, माझ्या आयुष्यात प्रेमच नाही...!
सगळेच का सोडून जातात हेच मला कधी कळलं नाही...!
अस वाटतं चूक माझीच होती म्हणूनच मी कोणाला आवडली नाही....!
