प्रेम हे असच असत
प्रेम हे असच असत
प्रेम हे प्रेम असत
करून बघावं एकदा
करतांना ते कळत नसत
केल्यावर ते उमगत नसत
प्रेम हे फक्त प्रेम असत
समजल तरी उमगत नसत
पण मन हे वेड असत
ते आपलंच तर ऐकत नसत
प्रेम हे असच असत
करून बघाव एक दा..
प्रेमात भावना खूप सुंदर असतात
त्या फक्त त्या दोघांना माहिती असतात
लोक म्हणतात काय असत हे प्रेम
प्रेम हे भावनांशी निघाडीत असत
करुन बघावं एक दा
सर्व आयुष्याची उलथापालथ करून ठेवत
प्रेम हे असच असतते
ते फक्त प्रेम असत
नसतो तो फक्त आवर त्या भावनांवर
करुन बघाव एक दा..
काय असत हे प्रेम
सांगून तर मुळीच होत नसत
झाल्यावर ते कळतही नसत
दोन जीवांन जोडणारा तो एक नाजूक धागा असतो
करुन बघाव एक दा..
दोन व्यक्तींना एकमेकांशी
जोडणारा एक भाव असतो
प्रेमाची कोणतीही एक व्याख्या नसते
ती फक्त एक भावना असते
या बेभान मनाचा
त्यावर कोणाचा आवरही नसतो
ना कोणाचा अंकुश
ना कोणाची लगाम
ते फक्त बेभान प्रेम असत
प्रेम हे असच असत
प्रेम फक्त प्रेम असत
करुन पाहाव एकदा तरी..

