STORYMIRROR

Rushikesh Asole

Classics

1  

Rushikesh Asole

Classics

पावसाचा थेंब...!

पावसाचा थेंब...!

1 min
577

थेंब...!

पावसाचा थेंब जो की स्वतःच अस्तित्व संपवतो

फक्त एकदा उंचावरुन पडाया ...

कुणीच तयार नसत स्वतःच रुपांतर वाफेत

करुन घ्याया ...!


पावसाचा थेंब तो त्याला पण वेगवेगळे रुपं

समुद्रात पडला तर भरती

शिंपल्यात पडला तर मोती

काम पण त्याचे तसेच.....


कधी मिठ बनवण्यासाठी उपयोगी पडलं

तर कधी शेत भिजवून भाकरीच पिठ बनलं

तर कधी खपरांच्या गळक्या घरामधून

गरम तव्यावर पडून नुस्त चर्रर्रर्र आवाज काढून परत वाफ बनलं.......!


तो थेंब ज्याने चातकाची तहान भागवली

तो थेंब ज्याने कित्येक कवींना कविता सुचवली

तो थेंंब ज्याच्या येण्याने कित्येकांची झोप उडवली

तोच थेंब ज्याच्या येण्याने कित्येक दिवस हात जोडून येण्यासाठी विनवणी करणार्‍या शेतकर्‍याची झोप भागली.....!


थेंब तोच फक्त परीस्थिती नुसार त्याला वेग-वेगळी नाव

अकाशातून पडला तर पाऊस

डोळ्यात आल तर अश्रु

गंगेत गेला तर तिर्थ

विहरीत पडल तर पाणी....!


फक्त थेंब जो की परत परत वाफ होऊन जमिनवरयेतो...

दुसर्‍यांच्या आनंदात आपल सुख शोधाया....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics