स्वप्नातील गाव
स्वप्नातील गाव

1 min

684
रात्रभर चांदणे बघत बघत
सोनेरी पहाट पण लोटली
झाडावरच्या भांटांना मंजुळ वाणी फुटली..
उगवल्या दिशा दाही प्रकाशली धरती..
गाव जागी झाले सारे
दिसे जणू स्वर्गीय रमणी....!
सकाळची वेळ घंटा
शाळेची वाजली,
लगबग घाई करुन
मुले शाळेला चालली...!
उलटली दुपार सांजवेळ होत आली
रानातून येणार्या गाईची ओढ
वासराला लागली,
प्रकाशमय झाल्या वाती
दिव्यांनी तुळस उजळली
मंद मंद प्रकाशात आनंदाई
शांतता पसरली...
रंगल्या बैठका, गोष्टी आजीने
काढल्या,
आजीच्या कथा ऐकत पापण्या लहानग्या निजल्या,
दिवसभराच्या कामाने थकून भागून
परत चांदण्यांकडे बघत बघत
गाव स्वप्नात शांत निजला...!