STORYMIRROR

ऋचा जोशी

Classics Others

2  

ऋचा जोशी

Classics Others

पाऊसवेड

पाऊसवेड

1 min
101

वसंत ऋतूची समाप्ती होता

मनात माझ्या मोहर उठतो

भल्या सकाळी अन् सायंकाळी

सुसाट वारा वाहत सुटतो


खिडकीतून डोकावूनी बघता

वा-याचा गार स्पर्श झाला

चाहूल हळूच द्यावी वाटे मग

ढगांतल्या मृग नक्षत्राला


चेहर्यावरती सरी झेलण्या

न राहवून मी बाहेर आले

वर्षेच्या येण्याने तरूंचे

पान पान मग तृप्त झाले


आसमंतात पसरू लागला

तो ओल्या मातीचा सुगंध

मोरांचा नाच पाहता मग

मन होऊन जाई मंत्रमुग्ध


टपो-या थेंबांचे संगीत वाजे

रिमझिम रिमझिम सरी कोसळता

वसुंधराही खूपच शोभे

हरितशालूचा साज चढविता


वाट पाहणा-या चातकाची

तृष्णा आज भागली होती

भेगारलेली धरणीमाता आज

पाऊसवेडी झाली होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from ऋचा जोशी

Similar marathi poem from Classics