STORYMIRROR

Devidas Shinde

Romance Others

4  

Devidas Shinde

Romance Others

पाऊस

पाऊस

1 min
274

झाकोळूनी येता घन,

पुलकित रान झाले..!

टपटप टपटप थेंब,

पानोपानी ओले..!


आनंदली वसुंधरा,

कोसळल्या धुंद धारा..!

थुईथुई थुईथुई,

मोर फुलवी पिसारा..!


कोंब पोपटी हिरवे,

जसे चैतन्य लाभले..!

लगबग लगबग,

असे शिवार फुलले..!


धरा सारी शहारते,

भेट पावसाची होते..!

कुणी बरे जोडले हे 

युगानयुगाचे नाते..? 


मनमेघ काळेभोर,

खोल खोल पोचलेले..!

मृदगंधी क्षण ओले,

पापण्यात साचलेले..!


असे बरसे आभाळ,

थेंब थेंब छळतात..!

सये तुला आठवून,

किती किती पोळतात..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Devidas Shinde

पाऊस

पाऊस

1 min वाचा

Similar marathi poem from Romance