ओली चिंब
ओली चिंब
श्रावण धारेत तू ओली चिंब व्हावी
होता स्पर्श माझा, तू मोहरुन जावी
माझ्या ओठांची भाषा,तुझ्या ओठांना समजावी
श्रावण धारेत तू ओली चिंब व्हावी
कुंतलावर साचलेले ते मोतीसम जल बिंदू
घेता मिठीत तुला उसळे भाव शिंधू
तुझ्या गालावरची लाली अलगत मी टिपावी
श्रावण धारेत तू ओली चिंब व्हावी
रातराणीचा दरवळे सुगंध
आपण दोघे होऊ बेधुंद
मिलनाची रात्र ही कधी ना सरावी
श्रावण धारेत तू ओली चिंब व्हावी
श्रावण धारेत तू ओली चिंब व्हावी

