STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

नशीब आहे फुटके

नशीब आहे फुटके

1 min
204

देऊ किती दोष मी

नशीब आहे फुटके ।

घर नाही दार नाही

वर आभाळही तुटके ।


एकेक दाना अन्नाचा

तोही कठीण दिवसाला ।

विचारच सरले आता

अर्थच काय जीवनाला ।


जिथे कुंपण असे मोडके

पाय देऊन जाती सारे ।

दिवसाही बघतो मी

अंधारातले सगळे तारे ।


म्हणू कसा माणूस मी

दुबळा लाचार वाटसरू ।

दिसेचना रस्ता पुढे

घेऊन कुबडी काय करू ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy