STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Romance

3  

Jyoti deepak Suryawanshi

Romance

नको मला...

नको मला...

1 min
304

नको मला तुझा बंगला

जिथे नसेल ओलावा प्रेमाचा

सुवर्ण अलंकारही नको

जर नसेल स्पर्श प्रेमाचा

भरजरी वस्त्रही नको

नको शालू जरतारीचा

नको फुलांची बागही मजला

नसेल गंध जर प्रेमाचा


वरवरचे सारे प्रेम नको

जर हृदयात नसेल जागा

ओढ प्रेमाची नसेल तर

नकोस बांधू प्रेमाचा धागा

माझे असणे आणि नसणे

तुजसाठी मौलिक नसेल तर

उगाच दिखावा खोट्या प्रेमाचा

नकोच मजला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance