STORYMIRROR

नावात काय आहे ...

Inspirational

4  

नावात काय आहे ...

Inspirational

नियती

नियती

1 min
469

तुझे आयुष्यात येणे सुखाची बरसात आहे

त्या भाग्यविधात्याला माझा कुर्निसात आहे।

नियती तू घाल कसेही उखाणे जगण्याचे

सोडवण्याचा माझा हुनर ही विख्यात आहे।

 

सोबतीला नेहमी हवेच कुणी कशाला

अंधार असला तरीही ही चांदरात आहे।

कबुली प्रेमाची द्यायची नव्हतीच कधी मला

ऐनवेळी डोळयांनी केला विश्वासघात आहे।

उभा दावा आहे ह्या बेमुवर्त नियतीशी

हिंमतीचे कवच मला मिळाले जन्मजात आहे।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from नावात काय आहे ...

Similar marathi poem from Inspirational