STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract

2  

Sanjay Ronghe

Abstract

मुखी विठ्ठलाचे नाम

मुखी विठ्ठलाचे नाम

1 min
9

मुखी विठ्ठलाचे नाम

हाती चिपड्या टाळ ।

भाली कुंकवाचा टिळा

गळ्यात तुळशी माळ ।

पडे पाऊल एकेक पुढे

चाले गजर हरी नामाचा ।

डोळे लागले पंढरीला

भाव मनात आहे भक्तीचा ।

वारी निघाली पंढरपुरा

भेटीला आतुर सारे विठ्ठला ।

ऊन पाऊस नाही काटे गोटे

पाहीन डोळे भरून रे तुला ।

चंद्रभागेत होईल स्नान

लोटला काठी भक्तांचा पूर ।

नाही कोणास आस कशाची

दर्शनासाठी सारेच रे आतुर ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract