मन हळवे पान
मन हळवे पान
ऐका देऊन ध्यान
उघडे करा कान ।
कुणा कशाची वान
देऊ नका हो तान ।
जितका द्यावा मान
वाढते तितकीच शान ।
पण हरपू नका भान
बघा होऊन लहान ।
मन हळवे पान
जपाना नाती छान ।
सुटताच ही जाण
जीवनाचे होईल रान ।
Sanjay R.
