STORYMIRROR

Prasad Sharad Salkar

Romance

4.3  

Prasad Sharad Salkar

Romance

मी, ती आणि बरंच काही

मी, ती आणि बरंच काही

1 min
251


तिची वाट पाहत गप्प बसणारा मी

आणि 

मला हळूच पाहणारी ती ||

तिचा आवाज ऐकू येता खुश होणारा मी

आणि

गालातल्या गालात हसणारी ती ||१||


नेहमीच भारावून गेलेलो मी

आणि

सर्वदा भानावर असलेली ती ||

शब्दांनी बोलका होणारा मी

आणि

फक्त नजरेनं अबोला तोडणारी ती ||२||


मनातलं गुपित अलगद लपवणारा मी

आणि

सर्व काही सांगून मोकळी होणारी ती ||

तिच्यासाठी कामावर जाणारा मी

आणि

माझ्यासाठी कामातून वेळ काढणारी ती ||३||


आज अचानक तिच्यामुळे मलाच भेटलेलो मी

आणि

माझ्याहून जास्त मला समजू शकलेली ती ||

प्रेमासाठी सर्व काही हरवून बसलेलो मी

आणि

मला प्रेमाचा रोज नवा अर्थ सांगणारी ती ||४||


Rate this content
Log in

More marathi poem from Prasad Sharad Salkar

Similar marathi poem from Romance