मी जगू कशी...
मी जगू कशी...
तुझ्या माझ्या नात्याला
लोटला सख्या काळ...
रुसवा तुझा टोचतो मला
अन् जाळतो वेदनांचा जाळ...
बांधली आपुली गाठ जणु
सप्तपदी ची वचने जशी...
प्राक्तनांच्या या दुव्याला
सांग मी तोडु कशी...
वाट माझी अवघडलेली
रस्ताही मज सुचेच नाही...
त्या वळणावरी पुन्हा
भेटशील का मला तूही...
दुरतीच्या चांदण्यांचा
भास का छळतो मनी...
त्रासलेल्या गांजलेल्या
या जिवाला तु संजीवनी...

