STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy

3  

Sanjay Ronghe

Tragedy

मी असा प्रामाणिक

मी असा प्रामाणिक

1 min
377

किती असावे सांगा

मी असा प्रामाणिक ।

आजवर मिळाली मज

हीच तर शिकवणूक ।


प्रयत्नांची पराकाष्टा

आणि तशीच वागणूक ।

हाती मिळते मात्र मज

का हो अशी फसवणूक ।


जो तो लुबाडतो मला

कशी करू मी जपवणूक ।

निसर्गही नाही सोबत

मग होते मनात धकधक ।


विश्वास करू मी कुणाचा

देवही नाही उरला तारक ।

नशिबाची दोरीच कच्ची

बळी मी हाच माझा फरक ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy