STORYMIRROR

Suchita Shah

Romance

3  

Suchita Shah

Romance

मैफिल

मैफिल

1 min
224

या सुरांच्या मैफिलीत, तू प्रिये जाऊ नको?

वेदनेचे गीत माझे तू कुणा सांगू नको ll


वेदनेचे गीत गाता हृदयी सल उमटले,

त्या सुरांचे शब्द होता भाव माझे गोठले,

गोठवलेल्या भावनेला तू अशी हिणवू नको,

वेदनेचे गीत माझे तू कुणा सांगू नको ll1ll


नको जाऊ तू प्रिये केवड्याच्या त्या बनी,

सुगंधाच्या त्या सोबतीला नाग डोलतो वनी,

प्रीती चीती धुंध स्वप्ने तू मनी पाहू नको,

वेदनेचे गीत माझे तु कुणा सांगू नको ll2ll


तुझ्या वेड्या प्रीतीची आस धरतो मी मनी,

वेदनेच्या या गीताचे सूर उमटू दे जीवनी,

या गीताच्या सोबतीला चंद्र-तारे ही नको,

वेदनेचे गीत माझे तू कुणाला सांगू नको ll3ll


Rate this content
Log in

More marathi poem from Suchita Shah

Similar marathi poem from Romance