क्षणभंगुर
क्षणभंगुर
ऊठ माणसा, वेळ ही क्षणभंगुर।
कधी होते सकाळ, तर रात्र ही कटू,
उगाची भितोस, खरा तूच खेळपटू
डाव रचला नियतीने पण तू लढ जिद्दीने
नको देऊ विश्वास खचू.।।1।।
येतील वादळ जीवनात, कास खऱ्याची धरून
चाल तू ध्येयाने, दुःखाची नौका जाईल तरुन,
सुखाची नाव येईल अंगणी, ठेव ही आस मनी,
वेळ ही जाईल निघूनही।।2।।
आनंदाचा सुर्योदय बघण्यास, हो तू तयार
बघ माणसा, या क्षणभंगुर जीवनाचा,
तूच खरा कलाकार, तूच खरा कलाकार.।।3।।
