कशी असावी
कशी असावी
कशी असावी लाखात एक नसावी
पण मनामध्ये अशी घर करणारी असावी
आठवल्यावर आठवेल अशी नसावी
स्वप्नात रोज दिसणारी असावी
रस्त्याने जाताना माझ्याकडे बघून हसणारी नसावी
पण डोळ्यांनी बरच काही सांगणारी असावी
भेटायच असेल तर माझी वाट पाहणारी नसावी
पण मी आल्यावर मला पुन्हा भेटणारी असावी
माझ्या 'हो' मध्ये 'हो' म्हणणारी नसावी
सतत मला त्रास देणारी असावी
फार अशी सुंदर नसावी
पण तिला पाहून काही तरी सुचले पाहिजे अशी असावी
माझ्या कवितेंवर दाद देणारी नसावी
पण माझ्या कवितेंवर लाजून हसणारी असावी अशी हसावी

