STORYMIRROR

Pradnya Deshmukh

Abstract Inspirational

3  

Pradnya Deshmukh

Abstract Inspirational

कलकलाटातला विसावा

कलकलाटातला विसावा

1 min
371

अशीच एक ओसरणारी संध्याकाळ रेंगाळत होती...

... तीव्र सूर्य मावळण्याची चाहूल पुन्हा एकदा झाली होती


शहरातला ऐकतर्फा मार्ग होता .. गाड्यांच्या भरदाव वेगाचा नुसता कलकलाट होता 

 ... पण जवळून पाहिले तर दोन गाड्यांच्या मधल्या क्षणभर अंतरामध्ये पण दिलासा होता 


दिवसाची रेलचेल हळुवार वाहणाऱ्या हवे सारखी झाली होती...

...पण कान लावले तर झपाझप चालणारी पाऊले कधीच थांबली नव्हती 


कुठे दूरवर एका तान्ह्या बाळाची सतत कुरकुर सुरु होती...

...त्याची आई माघार न घेता संथ राहण्याच्या जोशात होती 


शाळेतून परतणाऱ्या मुलांच्या आवाजात आतोनात उत्साह होता

...कधी नाही ते त्या आळशी मांजरी ने देखील डोळ्याच्या कोपऱ्यातून सुस्कारा सोडला होता  


मधू-मालतीच्या लांबलचक फुलांच्या फांदीत काही पक्षी किलबिलाट करत होते... 

...बहुतेक ते घरट्यात परतून विश्रांती मध्ये एकमेकांशी संवादात गर्क झाले होते 

 

मनातल्या गोतावळ्यात देखील असा एखादा सुखद विचार असतो मात्र खरा ...

... त्याच्या कडे परत वळून बघण्याच्या आधीच दुसऱ्या ने झपाटा घालून आपले स्थान केले असते ठाम  


शांतता हा मनाचा नुसता खेळ आहे ... 

...आजच्या जमान्यात तो अळवावरचा मनसोक्त फिरणारा पण कधीच न स्थिरावणारा थेंबच आहे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract