STORYMIRROR

Shrikrishna Kendre

Tragedy

4  

Shrikrishna Kendre

Tragedy

काय केला गुन्हा....

काय केला गुन्हा....

1 min
484

सांग.....

सांग ना रे 

तु मला...

काय....

काय केला रे 

मी गुन्हा.....?


गर्भात तु रे 

कितींदा लाथाडले....

त्याचे कौतुके

केवढे केले....


जन्मावेळी 

मृत्यू दिसला....

तुझ्याचसाठी

 त्रास मी सोसला....


उठून बसला

हसू लागला....

डोळे बंद

 दिसू लागला....


आंगणी खेळला

खेळतांनी रडला....

उरातला हुंदका

डोळ्यातून पडला....


नेसले मी रे

फाटके लुगडे....

भूख असोनि दिले 

पोटाला चटके....


दिले तुला रे मी

उडण्या पंखे....

घेतली भरारी 

तु स्वप्नासंगे....


हर आव्हानां

भिडत मी गेले....

वादळातही

खोपा मी झाले....


सांगशील का रे बाळा

तु आता तरी मला....

विसरूनि गेला मज

मी काय केला गुन्हा...?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy