काट्यावरती
काट्यावरती
तुझ्या प्रेमाचा खेळ आहे अनोखा
येता जाता वाईट बोलून देतेस धोका
माझा जीव ठेवला प्रेमाच्या काट्यावरती.....
जेव्हा तुला पाहिलं मन माझं ना राहिलं
माझं सारं जीवन तुझ्या प्रेमाला वाहिलं
साजणी तू का माझ्या मनावर वार करती.....
नजरेला तुझं राणी सावळं रुप आवडलं
प्रेमात आहे मी तुझ्या माझं नशीब उघडलं
तुला सोडून माझ्यावर किती गं मुली मरती...

