Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajan Patekar

Romance

4.0  

Rajan Patekar

Romance

कालचीच जणू गोष्ट होती

कालचीच जणू गोष्ट होती

1 min
11.9K


कालचीच जणू गोष्ट होती

ती माझ्या जवळ होती

गालात खडी डोळ्यात हसू

मलाच नेहमी बघत होती

कालचीच जणू गोष्ट होती !!


चहा पिताना वडापाव खाताना 

नजरेला नजर भिडत होती

कुणालाही कळता कामा नये अशी

काचेत मला बघत होती

कालचीच जणू गोष्ट होती !!


सुख असो वा दुःख सगळं शेअर ती करत होती

रुसव्यात जनु दुरूनच कुशीत माझ्या शिरत होती

कालचीच जणू गोष्ट होती !!


सर्व सुरळीत असताना नजर कुणाची लागली होती

मान खाली नजर झुकवून दुरूनच ती वळत होती

कालचीच जणू गोष्ट होती !!


बोलणं कमी झाल्यामुळे रात्र निवांत जात होती

न संपणाऱ्या रात्रींना ती नसून माझ्या सोबत

होती

रात्रीचा दिवस अंन दिवसाची रात्र कशीबशी जणू होत होती

कालचीच जणू गोष्ट होती !!


नशिबा पुढे कुणी काय करेल हीच खंत होत होती

आपलीच व्यक्ती परकी झाली हीच गोष्ट खुपत होती

कालचीच जणू गोष्ट होती!!


मागे मला सोडून ती

चालली कुणाची होऊन ती

सुखी रहावी नेहमी अशीच माझी प्रार्थना होती

आणि शेवटी एवढंच वाटतं कि कालचीच जणू गोष्ट होती !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance