STORYMIRROR

किशोर टपाल

Romance

3  

किशोर टपाल

Romance

काहुर.

काहुर.

1 min
1.0K

कृष्णाच्या मनातील राधेच्या प्रेमाच काहुर. ................


मी तुझ्या अनं तु माझ्या मनात

कुठे ही शोध नको राधे मी तुझ्या मनात...


तुझी अनं माझी गोकुळाची संगत

यमुना काठी दोघांची गंमत...


तुझं अनं माझं स्मित पाहणं प्रेमात

अनं अवेगान आलिंगन देण प्रेमात...


तुझा अनं माझा गुंततो श्वासात श्वास

तु लाजेन सोडतेस नि:श्वास....


तु अनं मी लीन होतो विश्वात

तु निघताना डोळे भरतात आसवातं....


पुन्हा तु , मी भेटतो काठात

अनं तेच काहुर मनातं..



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance