STORYMIRROR

Shreyasee Mantrawadi

Romance

3  

Shreyasee Mantrawadi

Romance

जाइजुईच्या वेलीवरूनी

जाइजुईच्या वेलीवरूनी

1 min
332

जाइजुईच्या वेलीवरूनी गंध लहरुनी आला

तुला आठवूनी मला पाहता

आरसा फितूर झाला ।।धृ.।।


मुग्ध चांदणे तव स्पर्शाचे

गुंतविते मज तुझ्या भोवती

मृदुल पाश हे तुझ्या स्मृतींचे

मनात पिंगा घालत राहती

तुझ्या सोबती रात्र एकली

ओढ अनावर धुंद क्षणाला ।।१।।


तुझी स्पंदने श्वास तुझा अन्

प्रेमळ हाक तुझी ती

हरवून जाते मीच रीत ही

अनवट तव प्रीतीची

अवघड रस्ते आठवणींचे

किती वळणे या वाटेला ।।२।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance