हरवलीयेस तू...
हरवलीयेस तू...
फुलणारा चाफा, ती रातराणी,तो निशिगंध
आताही ठेवतात तुझे प्रश्न पुढ्यात माझ्या,
तुझ्या केसात माळलेला मोगरा,पहिल्या भेटीतला गुलाब,
विचारत होता हल्ली तुझा स्पर्श त्यांना का होत नाही,
अंगणातला पारिजातक,भीती काठची जाई.
खुणवत राहते मला,नेहमी भासवत असते की एकटा आहे,
गच्चीवरची ती मोगऱ्याची जाळी,
पहिल्यासारखी बहरत नाही,
दारातला तो आंबा ही,
पहिल्यासारखा मोहरत नाही.
कोपऱ्यावरून जाताना ही बसलेल्यांचा नजरा बघत नाही मला,
हल्ली त्या शोधत असतात माझ्या बाईकच्या मागच्या सीटवर तुला.
तो कॅफे हल्ली किंचाळत असतो,
एकातांचा भयाण शांततेने,
त्या देवळाच्या पायऱ्या हल्ली जास्त भासायला लागल्यात.
रात्र ही पहिल्यासारखी गोजिरी नाही उरली,
हल्ली जास्तच काळवंडायला लागलीय,
काजवे ही स्थिर होतायेत,त्यांनीही टीमटीमायच सोडलय आता.
तुझ्या चॉकलेट्सचे ते उष्टे रॅपर्स,
तू दिलेल्या शर्ट चे तुटलेले बटन,
तू दिलेल्या घड्याळ्याचे काटे,
सगळे सगळे किंचाळून सांगत असतात की तू,
तू हरवलियेस ओघात वेळेच्या,
आणि माझी लेखणी शोधत असते नेहमी तुला तुझ्या हळव्या आठवणींन मध्ये

