STORYMIRROR

Sushama Vadalkar

Abstract

3  

Sushama Vadalkar

Abstract

हिमवर्षा

हिमवर्षा

1 min
264

कृष्णवर्णी धरेला

 श्वेतांबर देणारा,

पाऊस पाहिला मी

बर्फात नाहणारा.


सोसाट वाहणारा

 तो थंडगार वारा,

अंगास झोंबणारा

 देई कसा शहारा!


बर्फात खेळताना

 गालावरी हि गारा,

हातात झेलताना,

रोमांच तो निराळा.


चांदीत मढवलेली

बर्फाच्छदित धरा ती,

पाहून थाट मोठा 

झाली मनास तृप्ती.


अंकूर त्या तृणांचा

 हिरवा मणी जणू तो,

होता तुरा तयाला

डौलात डोलणारा!


दिसला कणात मजला

दैदिप्यमान मोती,

वर्षाव तो हिमाचा 

किमया कुणाची होती!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract