STORYMIRROR

Sushama Vadalkar

Others

3  

Sushama Vadalkar

Others

कवितेतला पाऊस

कवितेतला पाऊस

1 min
171

रूप मनोहर पावसाचे

थेंबातून अत्तर पाझरते,

कणाकणातून मृत्तिकेच्या

सुवासाची लहर पसरते.


उरात माझ्या सुवास भरतो

नासिकेस तो शहारतो,

रोमरोमात आनंद दाटतो

उत्कटतेने उचंबळतो.


चित्त न रहाते था-यावर

पावसात ते डोलू लागते,

नववधूसम सृष्टी भासते

हलकेच तीही लाजू लागते.


कांती तिची नितळ हिरवी

तृणांचे गोंदण शोभे भाळी,

इन्द्रधनूची नथणी ल्याली

लाली सजली या आभाळी.


पावसाने सौंदर्य बहरले

चैतन्याचे पुष्प उमलले,

पाकळ्यांच्या अधरातून

गोड लाजरे हसू उमटले.


पाऊस मुक्त विचारांचा

मनात असा माझ्या पडला,

बरसल्या शब्दांच्या धारा

कवितेत हा मला सापडला.


Rate this content
Log in