STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Romance

3  

Vishal patil Verulkar

Romance

एकच...

एकच...

1 min
204

एकच शब्द, तो पण बळ देणारा 

एकच हाक, ती पण प्रेमाची


एकच मिठी, ते पण हर्षाची

एकच आवाज, तो पण हृदयातून 


एकच नजर, ती पण मनातून

एकच स्पर्श, तो पण थरथरुन 


एकच कटाक्ष, तो पण हळूच

एकच होकार, तो पण लाजून


एकच रबडी, ती पण अर्धी वाटून

एकच पिक्चर, तो पण टॅक्स फ्री


एकच KISS, तो पण ओठावर

एकच मिठी, ती पण आकाशाएवढी


एकच हात, तो पण केसांना कुरवाळून

एकच झोप, ते तिच्या पण मांडीवर


तिने मला खूप दिले ते पण न मागुन 

स्वर्गच जणू मिळाला तो पण न मरुन


फाटकी झोळी माझी ती पण वाहिली भरुन 

आणखी काय हवे मला प्रेयसीकडून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance