एक रात्र अशीही
एक रात्र अशीही
एक रात्र अशीही
काळोखात दाटलेली
तुझ्या मिठीत
आकाशगंगेत
तरंगत सुटलो अंधारात!!
अंधारलेल्या रात्रीत
स्वप्नात तू आलीस
येऊन मजजवळ
मी गेले स्वप्ननगरी!!
स्वप्ननगरी जाऊन
सजवली प्रित
तुझ्या मिलनाची
उमलली नवी रित!!
त्या रात्रीच मी तुला
बघत होतो
बघता बघता
मी स्वत:च बहरत होतो!!
रात्र फार झाली होती
खेळ आपला चालला
तू तेव्हा स्वप्नात
प्रेमाचा गड गाठला!!
सुटले होते भान
झाले मोकळे रान
जवळ येऊन प्रिये
माझी भागली तहान!!
कुठे गेला काळोख
दिसेनासा झाला
तुझ्या रुपाचा प्रकाश
गगनात मावेनासा झाला!!
सर्व सुख मला देऊन
तू मात्र परतली
तेव्हा त्या रात्री
डोळ्याची पापणी भिजवली!!
कळत नव्हते मला
काय करु आता
हृदयात माझ्या
टोचला होता काटा!!
कधी न सरावी रात्र
वाटत होते अशीही
पण मात्र तुझ्या स्वप्नाची
एक रात्र अशीही.....
एक रात्र अशीही!!

