डोळ्यात आटलं
डोळ्यात आटलं
ती म्हणे आपलं नातं तुटलं
काय सांगू माझं नशीबचं फुटलं....
विचार केला असं कसं प्रेम झालं
केलं तर केलं जिवापाड का प्रेम केलं
माझ्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात आटलं...
तिचं माझं झालं बोलणं बंद
का दूर झाला माझ्या प्रेमाचा कंद
माझं मन तिच्या दु:खात किती दाटलं...
दुसऱ्याचा कधी विचार ना केला
आज तुझ्या आठवणीत जीव गेला
तिचं प्रेम का माझ्याशी इतकं तटलं...
