बोचरी आठवण
बोचरी आठवण
आठवण जपणारी
आठवण बोचणारी
मुलायम काट्यांना
फुलांसम टोचणारी
आठवण हळवी जराशी
आठवण जळजळ उराशी
कधी सुखावणारी उब
कधी ओलावा उशाशी
आठवण आकांत सारा
आठवण एकांत प्यारा
गर्दीत एकटं पाडे अन्
एकट्यात तोच सहारा
आठवण डोळे पाणावलेले
आठवण काही जाणवलेले
आसवे हे विद्रोही सारे
तरी हसून मी आवरलेले

