बंगला.
बंगला.
तुजविन दिसतं नाही मी चांगला
तुझ्यासाठी बनविण प्रेमाचा बंगला..
मनातली गोष्ट माझ्या मनात राहते
लपून लपून तू का मला अशी पाहते
प्रेमात तुझ्या राणी माझा जीव दंगला..
आठवणींत येतं माझ्या तुझं रूप सावळ
एकांतात भेटून तू मला मिठीत आवळ
तुझ्या स्वप्नांत माझा हा वेडा जीव रंगला..
बघ एकदा राणी तू माझं काळीज फाडून
जाऊ नकोस अशी तू माझी आशा मोडून
दूराव्यात तुझ्या साजणी माझा जीव पांगला..

