भाव भावनांचा खेळ सारा
भाव भावनांचा खेळ सारा
भाव भावनांचा खेळ सारा ।
मधेच येतो सुसाट वारा ।
लोप पावतो गगनात तारा
कडकड वीज देते इशारा ।
वाजे नभात ढोल नगारा
होतात सुरू पाऊस धारा ।
चिंब भिजतो सारा पसारा
नेतो वाहून उभा निवारा ।
वाहे डोळ्यात अश्रू धारा
पुसायला कोण, नाही थारा ।
