बेधुंद वेड्या सरी..
बेधुंद वेड्या सरी..
बेधुंद वेड्या सरीत, थेंब बरसले
बरसले अन पावसाचे सप्तसूर..!!
सप्तसूर प्रीतीचे नयनरम्य हे..
हे क्षण सुखद आठवणींचे टिपुर..!1!
टिपुर थेंब वेड्या पावसाचे
पावसाचे अवखळ तराणे..!
तराणे मनीचे ओलेचिंब..
ओलेचिंब बेधुंद गाणे...!2!
गाणे मदमस्त प्रीतीचे
प्रीतीचे खुळे बहाणे..!
बहाणे करावे मी किती...
किती हे मनाचे मोहरणे..!3!
मोहरणे तुझिया स्पर्शाने
स्पर्शाने दरवळे कांती..!
कांती अलवार शहारता...
शहारता, फुलते प्रीती...!4!
प्रीती ही गोड गुलाबी
गुलाबी स्वप्नांत भूलते..!
भूलते मन आठवणींत...
आठवणींत तुझ्या सुखावते..!5!
सुखावते मज ही पाऊसधारा
पाऊसधारा मृद्गंधाची..!
मृद्गंधाची वेडी ही अधीर धरा...
धरा ही आतुरलेल्या पावसाची..!6!
पावसाची अलवार बरसात...
बरसात आज माझिया अंगणी..!
अंगणी सुखावली ही धरा मिलन वेडी...
वेडी धरा तृप्तावली आज मनोमनी..!7!

