बाक
बाक
तो बाक बघ अजून पण तिथेच आहे
उणीव फक्त तुझी आहे
कधी तरी बसलो होतो त्यावर
हसलो रडलो भांडलो जवळ आलो
तरी बाक काही तो सोडला नाही आपण
कधी तू आधी यायची मी उशिरा
मी आलो की मग तुझे रुसणे
मग मी तुला विनवणे
सगळे काही तो बघायचं
आजही तो तिथेच आहे
मी पण तिथच आहे
फक्तं तू नाही

