अवेळी पाऊस
अवेळी पाऊस
नभी दाटला पाऊस,
येई आठव मनात,
अवकाळी येता तु रे,
कसे करू मी स्वागत...
तुझं येणं अवेळीस,
स्वप्न भासे उजेडात,
टपटप येता तु रे,
भीती दाटते मनात...
जरी आतुर भेटीस,
कशी सोडू जनरीत,
ओढ लावी कशी तु रे,
जडे तुझ्याशी हि प्रीत....
तुझ्या भेटीची रे आस,
शब्द शब्द दाटतात,
भुुईवरी येता तु रे,
स्वर मंंजूळ होतात ..

