STORYMIRROR

Sanjay Ronghe

Action Inspirational

3  

Sanjay Ronghe

Action Inspirational

अनोळख्या वाटा

अनोळख्या वाटा

1 min
193

सगळ्याच वाटा इथे अनोळख्या

जायचे कुठे ते ठरलेच नाही ।

एक एक पाऊल पडते पुढे

आलो कुठे मी कळलेच नाही ।

लागलेत किती ते खाचखळगे

पडलो झडलो मोजलेच नाही ।

वणवण चाले ही पोटासाठी

अजून पोट ही भरलेच नाही ।

दशा मनाची दिशा जगण्याची

इच्छा कुणाचीच हरली नाही ।

दूर कुठे या संपतील वाटा  

वेळ अजून ती सरली नाही ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action