STORYMIRROR

Pallavi Kantole

Inspirational

3  

Pallavi Kantole

Inspirational

आयुष्यातले मोरपीस

आयुष्यातले मोरपीस

1 min
196

आयुष्य खाचखळग्यांनी

भरलेलं असताना

इतरांच्या आयुष्यात

प्रकाश टाकतात

येणाऱ्या अनंत समस्यांना

दोन हात करताना

चिमुकल्या मनात

झुंजण्याची जिद्द

निर्माण करतात

मिळालेल्या अनुभवातून

विद्यार्थ्यांचा

वर्तमान पेरत असतात

 निःस्वार्थ भावनेने

आयुष्य कसं जगायचं

ते नकळत शिकवून जातात

खरंच गुरु काय असतात..?

ज्या व्यक्तीला आपण

गुरुजी शिक्षक गुरु

मास्तर अशा अनेक

नावांनी संबोधत्त असतो

पण गुरु तर ती व्यक्ती आहे

जी आईच्या

स्तरापर्यंत पोहोचलेली असते

खरंच आईसारखं निःस्वार्थ

प्रेम करून अलगद

विद्यार्थ्यांच्या भावनांना

स्पर्श करणारे

मोरपीस असतात

मा स्तर...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational