STORYMIRROR

Nandkishor Thombare

Abstract

3  

Nandkishor Thombare

Abstract

आयुष्याचा पोष्टमन

आयुष्याचा पोष्टमन

1 min
173

आयुष्याचा पोष्टमन....

आज पुन्हा एकदा दारी आला.

कुठल्याही सही, शिक्क्याशिवाय असलेला,

मुदतवाढीच्या करारनाम्याचा लखोटा हाती ठेवला.


अजूनही कारारनाम्यात,

अटी साऱ्या जुन्याच आहे.

अंतिम निर्णयाचा अधिकार,

म्हणे फक्त माझाच आहे.

तो बेरका नुसता डोळ्यात हासला,

आणि ह्या छदाम्याने तो नेमका टिपला.


मी म्हणालो.....

अरे आता तरी अटी थोड्या शिथिल कर,

कुठेतरी पॉवर ऑफ ऑटोर्नीचा उल्लेख कर!

मान्य आहे मला, प्रोपर्टी सारी तुझीच आहे

ट्रस्टी म्हणून तरी, थोडा अधिकार देवू कर!


त्यावर तो म्हणाल ......

माझापण गुरगुरणारा एक बॉस आहे 

ऑडिट रिपोर्टच्या डेडलाइनचे

माझ्या डोक्यावर खुप प्रेशर आहे

टर्म ऑण्ड कंडीशन तू नीट वाच 

अटी आजून जाचक होताय!

आणि तुझ्या बकेट लिस्टच काय?

कधी पूर्ण करणार?, 

काही कळतय काय?


मी म्हणालो .......

आज पर्यंत मलातरी, 

सर्व कुठे वेळच्यावेळी मिळालय?

डिले झाला तुझ्यामुळे,

कधी मी फाईन मागितलाय?


डायबेटिसलाही मी गोड करून घेतलाय,

B Pलाही 'बहोत प्यारसे' कुरवाळतोय!

आणि परीक्षेच्या मार्काप्रमाणे,

डोळ्यांचा नंबर वाढतच राहीलाय,

सांग, कधी तुझ्याकडे कंप्लेंट केली हाय?


ह्यावर तो हासत म्हणाल ....

बालपण, कुमारपण खेळलोय की तुझ्यासंगे

तारुण्यातही कानाडोळा केला,

जेव्हा तुझी रासलीला रंगे!

गाडी तुझी आता घाटा मधे आहे,

टॉप गियर नको आता,

स्पीड गव्हर्नरही सांगे.

इच्छा, अपेक्षांच तू नको दाबू एक्सलेटर

भले असो condition what so ever!


म्हणून म्हणतो ....

आहे त्यात मस्त राहा, मजा कर

आणि ह्या येथे

Received म्हणून सही कर


असा हा आयुष्याचा पोष्टमन .....

दर वाढदिवसाला शांताकॉलज सारखा

न चुकता दारी येतो

भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छासह

मुदतवाढीच्या करारनाम्याचा, 

गुलाबी लखोटा हाती ठेवून जातो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract