STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance Others

3  

NIKHITA DAKHORE

Romance Others

आठवणीतील चहा..☕

आठवणीतील चहा..☕

1 min
248

आठवते का रे तुला 

कॉलेजची आपली 

पहिलीच भेट...

नजरेनं झालेला 

नजरेशी संवाद थेट...


आठवते का रे तुला 

बसमधून केलेला तो

धक्काबुक्कीचा प्रवास...

मला शिट हवी तर

तु बसमध्ये हवास...


आठवते का रे तुला 

मी दिलेलं संवादात्मक 

स्नेहसंमेलनातील भाषण...

तु बोललेल मॅडम

आम्हाला भाषण नको पाहिजे राशन...


आठवते का रे तुला 

कट्ट्यावर सोबत मित्रांसवे

घेतलेला चहाचा पहिला चस्का...

मी नाही नाही म्हणताना

मला लावलेला मस्का...


आठवते का रे तुला 

माझ्याकडे रागात पाहताना 

घेतलेला चहाचा घोट...

गरम गरम चहांने

तुझा पोळलेला ओठ....

आठवते का रे तुला ......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance