आठवणींचा सागर किनारा
आठवणींचा सागर किनारा
आजही आठवण येते ना रे माझी तुला,
भिजलेले तुझे डोळे आठवतात ना आजही मला.....
आठवण करतोस माझी जेव्हा रमते मी माझीच,
तुझ्या मनातली ती हाक ऐकते मी नेहमीच.....
राहू दे तुझ्याकडे माझ्या आठवणींचा पसारा,
त्यातलाच एक आठवणारा क्षण म्हणजे तोच आपला सागर किनारा.....