आठणीतला पाऊस
आठणीतला पाऊस
आठवत का तुला ते,
पावसात चिंब दोघांनी भिजलेलं |
अन एकमेकांकडे पहात,
पाणी अंगावरच जिरलेलं ||
धरणीच्या चिंब प्रेमाने ,
आकाशही होत भरून आलेलं |
आकाशाचे प्रेम सरीतून त्या,
धरणीपर्यंत ते पोचलेलं ||
गुलाबी गालावर तुझ्या ,
अलगद थेंबाने त्या थांबलेलं |
ओठांना स्पर्शुन तेव्हा,
लबाड पावसाने मला खिजवलेलं ||
बरसणाऱ्या पावसात हळूवार,
प्रेम आपले बहरलेलं |
हातात हात असुनही सखे,
मन मात्र आपले शहारलेलं ||
मजसारखे तुझ्या कोमल स्पर्शाने,
वाऱ्याने हि बेफाम झालेलं |
अन ओंजळीत तुझ्या शांत,
थेंबा थेंबाने विसावलेलं ||
आता पाऊस नेमेची येतो,
सरींसोबत तुझी आठवण फक्त |
ओंजळ माझी रिती राहिली,
प्रेमाचे स्वप्न मनी ते उरलेलं ||

